ध्येय प्राप्तीसाठी स्वयंशिस्त समर्पण आणि सातत्य महत्वाचे:कॅप्टन सुनील पाटील

धुळे, (प्रतिनिधी)

समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे (धुळे) येथील बी. एस. डब्ल्यू. प्रथम वर्ष या वर्गातील अभ्यासक्रमातील क्षेत्रकार्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन दि. ६ जानेवारी २०२५ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत जुनवणे, तालुका जिल्हा धुळे येथे करण्यात आले होते. सदर ग्रामीण अध्ययन शिबिराच्या समारोप दि. ११ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आला.
सदर समारोप कार्यक्रमाला मा. डॉ. सुनील पाटील (जीईटी आर्टस्, कॉमर्स अँड सायंस कॉलेज, नगाव, धुळे) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून योगेश खैरनार (उपसरपंच), मनोज पाटील (मुख्याध्यापक, जि.प. शाळा), विनोद जोशी (मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय) तसेच शिबिर समन्वयक प्रा. मेघावी मेश्राम आणि प्रा. डॉ. संजीव पगारे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गीत गायन करून पाहुण्यांचे स्वागत केले.
स्वागत समारंभानंतर सहा दिवशीय शिबार अहवाल वाचन देवेंद्र पवार या विद्यार्थ्याने केले. त्यानंतर भारती बागुल आणि वरुण पवार यांनी ग्रामीण अध्ययन शिबिरात आलेले अनुभव मनोगतातून व्यक्त केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कॅप्टन मा. डॉ. सुनील पाटील यांनी समारोपप्रसंगी मार्गदर्शन करीत असताना म्हणाले की, आजही ग्रामीण भागात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात दिसून येते, त्याकरिता गावातील युवकांनी ग्रामीण भागात पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांना शिस्त, सातत्य आणि वागणुक किती महत्त्वाची आहे. युवकांमध्ये शिस्त, वक्तशीरपणा, सातत्य आणि हुशारी दिसून येते. मात्र योग्य वर्तनाचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आज युवक विविध समस्यांनी ग्रस्त आहे. जसे कि, बेरोजगारी, मादक पदार्थांचे सेवन, मोबाईलचे व्यसन आणि सामाजिक माध्यमाचा गैरवापर. तेव्हा युवकांनी आपले ध्येय ठरवावे आणि आतापासून त्या ध्येयाच्या प्राप्ती करीत मार्गक्रमण करण्यास सुरुवात करावी. अश्याप्रकारे विविध उदाहरणाच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ सरांनी मार्गदर्शन करीत असताना विद्यार्थ्यांना सहा दिवस केलेल्या कामाबदल विचारणा केली आणि शिबिराचा अहवाल सविस्तर लिहावा असे सांगितले.
या सहा दिवसाच्या शिबिरात विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
बी. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षाच्या ग्रामीण अध्ययन शिबीर यशस्वी करण्यासाठी शिबिराचे समन्वयक प्रा. मेघावी मेश्राम, सहसमन्वयक प्रा. डॉ. संजीव पगारे व प्रा. डॉ. दिलीप घोंगडे. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी व शिबिरार्थी यांनी परिश्रम घेतले.
ग्रामीण अध्ययन शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा वळवी तर आभार प्रदर्शन देवयानी पाटिल हिने मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top