निलेश राणे इम्पॅक्ट: कर्नाटक मलपी येथील नौका पकडली.

कर्नाटकी घुसखोर मलपी बोटधारकांचे धाबे दणाणले: महिन्याभरातील सलग चौथी कारवाई. मालवण,ता.३१:-महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करणाऱ्या मलपी बोटींच्या विरोधात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यानंतर आज पुन्हा महाराष्ट्र सागरी जलधीक्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी बोटीवर कारवाई झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणारी कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नौका…

Read More

वेंगुर्ला नगर वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन…!

वेंगुर्ला,ता.३१:-वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत वेंगुर्ला येथील नगर वाचनालयातर्फे ३१ डिसेंबरपासून ग्रंथप्रदर्शन सुरू केले आहे. हे ग्रंथप्रदर्शन १ जानेवारी दुपारपर्यंत वाचकांसाठी खुले असणार आहे. या ग्रंथप्रदर्शनात संस्थेने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात खरेदी केलेले ग्रंथ ठेवण्यात आले आहे. तरी वाचकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांची निवड

कार्याध्यक्ष पदी संतोष राऊळ,सचिव गणपत घाडीगावकर,खजिनदार मधुकर प्रभू गावकर निवड कणकवली,ता. ३०:-सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग या रजिस्टर संस्थेची पुढील तीन वर्षासाठी जी जिल्हा कार्य करणे जाहीर करण्यात आली आहे. या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून संतोष राऊळ, सचिव पदी गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर,उपाध्यक्षपदी राजू राणे…

Read More

सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात लायन्स क्लबचे उल्लेखनीय काम-वैभव नाईक

लायन्स क्लब कुडाळच्या लायन्स फेस्टिवलला मा.आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन दिल्या शुभेच्छा कुडाळ, ता.३०:-लायन्स क्लब कुडाळच्या वतीने कुडाळ हायस्कुल मैदान येथे सिंधू लायन्स ऑटो एक्सपो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या लायन्स फेस्टिवलला माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात…

Read More

प्रा.रुपेश पाटील यांचे अभिनेते संजय खापरे यांनी केले कौतुक.!

कोल्हापूर येथील संमेलनात प्रा. रुपेश पाटील यांनी खुमासदार सूत्रसंचालनाने जिंकली मने. कोल्हापूर,ता. ३०:-सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध निवेदक व व्याख्याते प्रा . रुपेश पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथील राजश्री शाहू महाराज सभागृहात संपन्न झालेल्या आई महालक्ष्मी संमेलन २०२४- या रंगारंग सोहळ्याचे आपल्या अनोख्या, ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून उपस्थित…

Read More

हिंदू धर्माची विचारधारा मनामनात रुजविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

संत सेवा पुरस्कार ह.भ.प.रमाकांत गायकवाड,ह.भ.प. तायाराम गुरव यांना प्रदान.. कणकवली,ता.२९:-मला पायीवारीला चालण्याचा योग आला. त्यावेळी एक वेगळीच अनुभूती प्राप्त झाली. या संप्रदायाची वर्षानुवर्षे , पिढ्यान पिढ्या सुरू असलेली वारीची विचारधारा,विठ्ठल चरणी असलेली श्रद्धा व भक्ती एका दुसऱ्या प्रति असलेले प्रेम,जिव्हाळा,निस्वार्थ सेवेवरील निष्ठा यामुळेच पुढे गेली आहे. हिंदू धर्माची विचारधारा प्रत्येक हिंदूंच्या मनामनात रुजविण्याचे काम खऱ्या…

Read More

संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना गजाआड करा;सीताराम गावडे

सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना सोमवारी देणार निवेदन.._ सावंतवाडी,तां.२९:-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली,या घटनेला वीस दिवस उलटून गेले तरी पोलिस मुख्य आरोपींना अटक करु शकले नाहीत, संतोष देशमुख यांची निघृण पणे हत्या करणाऱ्या संशयीत सर्व आरोपिंना त्वरीत अटक करण्यात यावी व या हत्तेला जबाबदार असणाऱ्या सर्वानाच कठोर…

Read More

मालवण बंदर जेटीसमोरील पार्किंगमधील मच्छिमारांचा पारंपारिक मार्ग खुला करा…

मंदार केणी व यतीन खोत यांची मागणी: बंदर विभागाचे वेदले लक्ष.. मालवण,ता.२८:-मालवण बंदरजेटी समोरील पार्किंग बंदर विभागाने निविदा प्रक्रिया करून खासगी ठेकेदाराला चालवण्यास दिले आहे. येथून मच्छीमारांचा किनाऱ्यावर येण्या जाण्याचा पारंपरिक मार्ग असून या ठेकेदाराने हा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे मच्छिमारांबरोबरच अनेकांची गैरसोय होत असून पार्किंग मधील मच्छिमारांचा पारंपारिक मार्ग खुला करावा, अशी मागणी…

Read More

सावंतवाडी महोत्सवात उद्यापासून होणार सुरुवात..

माजी मंत्री दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या उपस्थित होणार शानदार उद्घाटन..! सावंतवाडी,ता.२८:-सावंतवाडी महोत्सव 2024 सावंतवाडी वासीयांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम 29 डिसेंबर ते 1 जानेवारी सावंतवाडी गार्डन संध्याकाळी ठीक सहा वाजता सुरू होणार आहेत.या कार्यक्रमांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे फूड स्टॉल तसेच विविध वस्तूंचे स्टॉल असणार आहेत तरी सावंतवाडी वासियांनी चार दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आनंद…

Read More

पिकूळे येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन…

दोडामार्ग,ता.२८:-साण्डू फार्मास्यूटिकल्स लिमिटेड आणि व्यंकटेश आयुर्वेदिक औषधालय व सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळेच्या वतीने उद्या ९ ते १ या वेळेत धालोत्सव रंगमंच लाडाचेटेंब येथे मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये एलर्जी, पचनाच्या समस्या, पक्षाघात वात विकार, भगंदर, स्त्रीरोग, त्वचाविकार, हाडांचे व सांध्याचे आजार, मूळव्याध, बालरोग, अन्य जुनाट विकार आदी…

Read More
Back To Top