माजी मंत्री दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या उपस्थित होणार शानदार उद्घाटन..!
सावंतवाडी,ता.२८:-
सावंतवाडी महोत्सव 2024 सावंतवाडी वासीयांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम 29 डिसेंबर ते 1 जानेवारी सावंतवाडी गार्डन संध्याकाळी ठीक सहा वाजता सुरू होणार आहेत.
या कार्यक्रमांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे फूड स्टॉल तसेच विविध वस्तूंचे स्टॉल असणार आहेत तरी सावंतवाडी वासियांनी चार दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे आवाहन दीपक भाई केसरकर
मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे-
दिनांक 29 डिसेंबर 2024
1) रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित
साज – ए – संगीत : सूर नवा ध्यास नवा आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम – गायिका धनश्री कोरगावकर यांची मधुर संगीत मैफिल
2) दिनांक 30 डिसेंबर 2024
इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित ब्युटी कॉन्टेस्ट / मिस सुंदरवाडी 2024
3) दिनांक 31 डिसेंबर 2024
आवाज आर्ट इव्हेंट निर्मित बेधुंद 2025 (जल्लोष नववर्षाचा) हिंदी – मराठी, गीतनृत्याची बेधुंद मैफिल
( इंडियन आयडॉल फेम राहुल खरे, सुर नवा ध्यास नवा महाविजेती सुष्मिता धापटे-शिंदे, सारेगमप मराठी फेम – ब्रम्हानंदा पाटणकर, गोवा आयडॉल फेम समृद्ध चोडणकर)
4) दिनांक 01 जानेवारी 2025
जल्लोष नववर्षाचा…..! सन्मान महिलांचा…..!
सावंतवाडीत रंगणार महिलांसाठी “खेळ महापैठणीचा”
विजेती – आकर्षक भरजरी पैठणी
उपविजेती – आकर्षक भरजरी साडी
तृतीय विजेती – मिक्सर
उत्तेजनार्थ तीन स्पर्धकांना मिळणार एक ग्रॅम प्लेटेड सोन्याची नथ
संपर्कासाठी क्रमांक – 09921501214