इन्सुली तपासणी नाक्यावर अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

११.६८ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्तः सोलापुर येथील एक ताब्यात..

बांदा
गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर इन्सुली तपासणी नाका, येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैधरित्या दारू वाहतूक करण्यात येणारा सुमारे ११ लाख ६८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल विवा क्लासिक समोर, सटमटवाडी (बांदा) येथे करण्यात आली.संशयास्पद स्थितीत असलेल्या MH-10-DT-5307 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या मागील भागात लपवून ठेवलेले विविध बँडचे ३६ बॉक्स विदेशी मद्य आढळून आले. ही कारवाई इनसुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top