रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी सिद्धेश सावंत यांची स्तुत्य निवड
सावंतवाडी प्रतिनिधी
रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी व्हॉईस ऑफ मीडियाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष व युवा पत्रकार सिद्धेश सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेकडून त्यांचा आज स्नेहसत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सल्लागार राजेश नाईक यांच्या हस्ते सिद्धेश सावंत यांना मायेची शाल प्रदान करण्यात आली. तसेच जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कार्याध्यक्ष अनंत धोंड, सचिव शैलेश मयेकर, प्रसिद्धीप्रमुख कवी दीपक पटेकर व सदस्य साबाजी परब, शुभम सावंत तसेच पत्रकार रुपेश हिराप, प्रसन्न गोंदावळे यांच्या उपस्थितीत ग्रंथ, श्रीफळ प्रदान करून सिद्धेश सावंत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान आगामी काळात आपण रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून तसेच व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून जनमानसांच्या विविध समस्या सोडविण्याचे प्रामाणिक कार्य नक्की करू, असा विश्वास नूतन अध्यक्ष सिद्धेश सावंत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पटेकर यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार अनंत धोंड यांनी मानले.