राणे कुटुंबाला आपला शत्रू मानण्याआधी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असलेले योगदान पहा.
राणे प्रतिष्ठानचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू यांचे कोकणातील मुस्लिम समाजाला आवाहन..
मुंबई प्रतिनिधी
राणे कुटुंबीय हे मुस्लिम समाजाचे शत्रू नसून वेळप्रसंगी ते अनेकदा मुस्लिम समाजाच्या मदतीला धाऊन गेले आहेत. त्यामुळे राणे कुटुंबीयांना आपले शत्रू मानण्यापूर्वी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असणारे योगदान देखील जाणून घ्या असे आवाहन राणे प्रतिष्ठानचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगु यांनी कोकणातील मुस्लिम समाजाला केले आहे.
आजवर निलेश राणे यांनी राणे प्रतिष्ठानच्या मेडिकल क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. ठाकूर, शेख, झापडेकर, काझी अशा मुस्लिम समाजातील ६ व्यक्तींवर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील एका शस्त्रक्रियेचा खर्च ५ ते ६ लाखांच्या घरात होता. परंतु राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यात आल्या. विशेष म्हणजे यातील एकही रुग्ण हा राणे यांच्या मतदार संघातील नव्हता. परंतु स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता आ. निलेश राणे ताबडतोब त्यांच्या मदतीला धाऊन
गेले.
आपल्या मतांच्या स्वार्थासाठी मुस्लिम समाजाचा उपयोग करून घेणारे अनेक राजकारणी आहेत. परंतु, संकटाच्या काळात धाऊन जाणारे क्वचितच काहीजण असतात. आ. निलेश राणे हे मदतीला धाऊन जाणाऱ्यांपैकीच एक आहेत. तेव्हा कोकणातील मुस्लिम बांधवांनी राणे कुटुंबियांच्या पाठीशी राहिले पाहिजे असे आवाहन राणे प्रतिष्ठानचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू यांनी कोकणातील सर्व मुस्लिम समाजाला केले आहे.