ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का..
कणकवली
ठाकरे शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, सतीश सावंत यांनी अखेर पालकमंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
सहकार, शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला सोडवता येतील म्हणून कार्यकर्त्यांशी बोलून आपण या ठिकाणी हा निर्णय घेतला. असे सतीश सावंत म्हणाले यावेळी पालकमंत्री नितेश राणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत श्री रावराणे, मिलिंद मेस्त्री उपस्थित होते
