कुडाळ प्रतिनिधी
जिल्हयातील नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीत सतत गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संर्कालत करुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना दिलेले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी गेल्या काही वर्षात तसेच सद्यस्थितीत सतत गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलित केली. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीतील घरफोडी चोरीचे 07 गुन्हे दाखल असणारा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार अनंत ऊर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर, वय 32 वर्षे, रा. माठेवाडा, कुडाळ तसेच वाहनाच्या बॅटऱ्या चोरी, गदीं मारामारीचे गुन्हे दाखल असलेला अभिलेखावरील 04 गुन्हे दाखल असलेला सलीम सादीक सय्यद वय 38 वर्षे रा. पिंगुळी गुढीपुर, ता. कुडाळ तसेच अवैध मटका जुगाराचा खेळ खेळणारा व मटका जुगाराचे 04 गुन्हे दाखल असलेला मटका बुको खलील हुसेन वाडीकर वय ६१ वर्षे रा. कोलगांव, फणसवाडी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग, त्याचेविरुध्द हद्दपारीची कारवाई करण्याकरीता स्वतंत्र अहवाल मा. उप विभागीय
दंडाधिकारी, कुडाळ यांचेकडे पार्टीवण्यात आलेले होते. त्यानुसार मा. उपविभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांचे न्यायालयात सदर प्रस्तावाची सुनावणी होवुन नमुद सराईत गुन्हेगार ।. अनंत ऊर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर, वय 32 वर्षे, रा. माठेवाडा, कुडाळ 2. सलीम सादीक सय्यद वय 38 वर्षे रा. पिंगुळी गुढीपुर, ता. कुडाळ 3. खलील खलील हुसेन वाडीकर वय ६१ वर्षे रा. कोलगांव, फणसवाडी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग. यांना दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग सह लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्हयातुन हद्दपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.
त्यानुसार नमुद गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेशाची कुडाळ पोलीस ठाण्या मार्फत बजावणी करण्यात आलेली असुन नमुद आरोपी हे हद्दपारीचे कालावधीत गोवा राज्यात राहणार असल्याने त्यांना गोवा राज्यात पाठविण्यात आले. मटका बुकीला हद्दपार करण्याची कारवाई ही सिंधुदुर्ग जिल्हयातील पहिलीच कारवाई कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक डॉ श्री मोहन दहोकर, मा. अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व मा उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी श्री विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस वाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस अंमलदार, कृष्णा केसरकर, उषा आईर, सुजाता तेंडोलकर यांनी केलेल आहे.
