मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट!
सावंतवाडी प्रतिनिधी
आमदार दीपक केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा कुटील डाव काहींचा आहे. मात्र असा प्रयत्न करणाऱ्यांना सावंतवाडीकरांनी योग्य जागा दाखवावी, असा गौप्यस्फोट उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिल्पग्राम येथे आयोजित सभेत केला. यावेळी आमदार दीपक केसरकर, संपर्क नेते श्री. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख संजू परब तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्क्ष पदाच्या उमेदवार नीता सावंत कविटकर तसेच सावंतवाडी शहरातील शहरातील डॉक्टर्स, इंजिनियर्, वकील, व्यावसायिक तसेच विविध स्तरातील बुद्धिजीवी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
