Anand Kandarkar

पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथील विद्युत वितरण च्या नियंत्रण कक्षाला दिली अचानक भेट

अधीक्षक अभियंता व अधिकाऱ्यांकडून घेतला कामाचा आढावा,नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना कुडाळ प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश आणि यांनी आज (शुक्रवारी) भेट दिली यावेळी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली यामध्ये अनेक सुधारणा कराव्या…

Read More

अंगणवाडी सेविकांना दर महीना मिळणार प्रोत्साहन भत्ता

मुंबई प्रतिनिधीअंगणवाडी सेविकांसाठी आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. दर महिन्याला अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. नुकतीच प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणांबाबत मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. भत्त्यासाठी सेविका आणि मदतनीस यांच्या एकत्रित कामाच्या निकषानुसार…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता श्री.राख यांच्याकडे ह्युमन राईट संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा कुडाळ प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे अनेक व्यावसायिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच शेतकरी व कष्टकरी बांधवांची विद्युत उपकरणांची हानी होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होत आहे. मागील आठवड्यापासून अनेक गावातील वीजपुरवठा पूर्णतः बंद…

Read More

दारू वाहतूक प्रकरणी पुण्यातील दोघे ताब्यात,सकाळी सव्वा नऊ सुमारास कारवाई

आंबोली पोलिसांची कारवाई; गाडीसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त. आंबोली प्रतिनिधीबेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुणे येथील दोघांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास चौकुळ-केगदवाडी येथे करण्यात आली. त्यांच्याकडून आलिशान होंडा सिटी कार जप्त करण्यात आली असून गाडीसह एकूण ७ लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे….

Read More

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक संपन्न

महावितरणांच्या कामांसाठी विशेष पॅकेज आणणार,खाते प्रमुखांनी कामांच्या ठिकाणी भेटी द्याव्यात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे. नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जात त्यातून होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सदैव दक्ष रहावे; सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून मदतकार्य आणि माहितीचे…

Read More

गोवर्धन गोशाळा उद्घाटन

गोवर्धन गोशाळा उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ,माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खासदार नारायण राणे यांच्या करंजे येथील गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आगमन झाले. नीलम राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे,आमदार रवींद्र फाटक,माजी आमदार प्रमोद जठार ,माजी आमदार राजन साळवी,माजी आमदार प्रवीण भोसले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी,प्रतिनिधी:-उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 मे 2025 रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे*.रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सकाळी 11.45, वाजता चिपी विमानतळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आगमन व हेलिकॉप्टरने मालवणकडे प्रयाण, दुपारी 12.15 वाजता, टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड हेलिपॅड, मालवण येथे आगमन व मोटारीने किल्ले राजकोटकडे प्रयाण, दुपारी 12.30 वाजता,…

Read More

कणकवली करंजे येथील गोवर्धन गोशाळेचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली,प्रतिनिधी:-कणकवली तालुक्यातील करंजे येथील कै. तातू सीताराम राणे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व कु.अभिराज निलेश राणे याच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या गोवर्धन गोशाळेचा शुभारंभ ११ मे ला दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, नितेश राणे, शिक्षक प्रसारक मंडळ…

Read More

💐जाहीर निमंत्रण!💐💐जाहीर निमंत्रण!!💐💐जाहीर निमंत्रण!!!💐🌹🙏🌹🙏🌹🙏

कु. अभिराज निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार…कै. तातू सिताराम राणे ट्रस्ट संचलित –🐄 ‘गोवर्धन गोशाळा’ 🐄उद्या ११ मे रोजी शानदार शुभारंभ…! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते होणार गोशाळेचे उद्घाटन .!🙏सस्नेह निमंत्रण🙏सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता-भगिनींना विनंती आहे की, या गोवर्धन गोशाळेला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे !🌹-सदैव आपलाच-🌹 खासदार श्री. नारायणराव राणे….

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली सैनिक भरती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार;आमदार निलेश राणे यांचे आश्वासन

शिवापूर येथील शहीद दहा जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या रणस्तंभाचे झाले आमदार निलेश राणे यांच्याहस्ते अनावरण शिवापूर पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबंध; आमदार निलेश राणे शिवापूर,प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली भारतीय जवानांची सैनिक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल.तसेच माजी सैनिकांच्या कॅन्टींग सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न…

Read More
Back To Top