सावंतवाडी प्रतिनिधी:
ऑक्टोबर 2026 च्या मासिक मीटिंगमध्ये दिवाळीपूर्वी संकुलाच्या इमारती सभोवती तसेच टेरेस, जिने यांची साफसफाई करायला पाहिजे यासाठी कोणालातरी साफसफाई करणाऱ्याला बघितले पाहिजे अशी मासिक मीटिंगमध्ये चर्चा सुरू झाली. यावेळी सर्व सदस्यांनी एका स्वरात सांगितले की यावेळी आपणच सर्वजण श्रमदानाने सर्व साफसफाई करूया.याला उपस्थित सर्व सदस्यांनी एका स्वरात अनुमती दिली.यासाठी रविवार निश्चित करून प्रत्यक्षात सर्व महिला व पुरुष तसेच मुलांनीही सहभाग घेऊन साफसफाईची मोहिम पूर्ण केली.
यावेळी सदस्य काशीराम गावडे यांनी स्वतःच्या ग्रास कटरने इमारती सभोवतालचे गवत कापले. महिलांनी झाडूने कापलेले गवत बाजूला केले. पुरुषांनी पाळ, कोयत्याने वाढलेली छोटी तसेच मोठी झाडी तोडली.काही सदस्यांनी महिलांनी गोळा केलेला कचरा कचराकुंडीत टाकला.अशाप्रकारे भाग्योदय संकुलाची साफसफाई सर्व सदस्यांच्या श्रमदानातून पूर्ण झाली.
यावेळी झालेली स्वच्छता पाहून स्वच्छता जिथे घरोघरी ,आरोग्य तिथे वास करी याचा मात्र प्रत्यय आला.यावेळी सर्वांचे मनोमिलन व एकजुट पाहून परिसरातील लोकांनीही सर्वांचे कौतुक केले.सर्व उपस्थित सदस्यांना सुजाता सावंत यांच्याकडून अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी सुनीता गावडे,सुजाता सावंत,स्वाती गावडे, सुधा गावडे, मानसी परब, योगिनी गवस, स्नेहा चितारी, नलिनी सावंत,, विशाखा पाताडे, कुमारी सीमा सावंत,कुमारी मृणालिनी चितारी आदि महिला तसेच शेखर चितारी, दीपक तारी,यशवंत गवस, राम राठोड, काशिराम गावडे, महेश परब,सुनील गावडे, कांता सावंत इत्यादी पुरुष सदस्य उपस्थित होते.
