अखेर पिंगुळी ग्रामस्थांचे पाचव्या दिवशी उपोषण मागे; प्रशासनाचे लेखी आश्वासन

पाझर तलाव बचाव आंदोलनाला यश;बांधकामे स्थगित ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

कुडाळ:
तालुक्यामधील पिंगुळी येथील पाझर तलाव वाचविण्यासाठी कुडाळ प्रांत कार्यालयासमोर जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर आणि पिंगुळी ग्रामस्थांचे सोमवारपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर आज पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या मान्य करीत लेखी आश्वासनाचे पत्र दिले. तसेच विकासकाला सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले. प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी उपोषणकर्ते गंगाराम सडवेलकर यांना लिंबू पाणी दिल्यानंतर उपोषणकर्ते गंगाराम सडवेलकर यांनी बेमुदत उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top