पिकूळे येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन…

दोडामार्ग,ता.२८:-
साण्डू फार्मास्यूटिकल्स लिमिटेड आणि व्यंकटेश आयुर्वेदिक औषधालय व सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळेच्या वतीने उद्या ९ ते १ या वेळेत धालोत्सव रंगमंच लाडाचेटेंब येथे मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये एलर्जी, पचनाच्या समस्या, पक्षाघात वात विकार, भगंदर, स्त्रीरोग, त्वचाविकार, हाडांचे व सांध्याचे आजार, मूळव्याध, बालरोग, अन्य जुनाट विकार आदी आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व चिकित्सा केली जाणार आहे. तरी या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य रत्नदीप गवस यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top