सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांची निवड

कार्याध्यक्ष पदी संतोष राऊळ,सचिव गणपत घाडीगावकर,खजिनदार मधुकर प्रभू गावकर निवड

कणकवली,ता. ३०:-
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग या रजिस्टर संस्थेची पुढील तीन वर्षासाठी जी जिल्हा कार्य करणे जाहीर करण्यात आली आहे. या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून संतोष राऊळ, सचिव पदी गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर,उपाध्यक्षपदी राजू राणे रामचंद्र कदम यांची निवड करण्यात आली आहे.
तर सदस्य म्हणून कुडाळ मधून एस. के. सावंत, दोडामार्ग रामचंद्र गाड, सावंतवाडी शामसुंदर कुंभार, विलास राणे, मालवण जिवाजी कोळमकर, कसाल सत्यवान परब, प्रभाकर सावंत, माणगाव विनायक मेस्त्री, वैभववाडी राजा पडवळ, शिरगाव देवगड सर्वोत्तम साटम, होंडा घाट दीपक मडवी, दिगवळे नाना गावडे, वेंगुर्ले कुंदन बांदेकर अशा पदाधिकाऱ्यांची २०२७ पर्यंत पुढील तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. नुकताच झालेला सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top