आंतर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलचा संघ सर्वोत्कृष्ट!

सावंतवाडी,ता. १०:-
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय आणि गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविदयालय रत्नागिरी आयोजित आंतरराज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राणी पार्वती देवी ज्युनि कॉलेजचा संघ प्रथम विजेता ठरला.

या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . सदर स्पर्धेचे विषय होते, ‘स्वामी म्हणे ऐसी आसुरी संस्कृती
करीत असे माती मानव्याची’,
‘मोबाईल की मैदान’,
‘अस्थिर भारतीय उपखंड आणि भारत’ . या तिन्ही विषयांवर आरपीडी संघाने आपले वक्तृत्व कौशल्य दाखवून प्रथम क्रमांकाचा चषक मिळवला . या कनिष्ठ महाविद्यालयीन संघात कु प्राची सावंत , कु अदिती राजाध्यक्ष , कु चिन्मय आसनकर हे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले होते . कनिष्ठ गटात वैयक्तिक बक्षिसाचे मानकरी दोन विद्यार्थी ठरले . कु . अदिती राजाध्यक्ष हीने द्वितीय क्रमांक पटकावून प्रमाणपत्र व रोख 5000 रुपयाचे पारितोषिक पटकावले . आर पी डी ची दुसरी विद्यार्थिनी कु . प्राची सावंत ही उत्तेजनार्थ क्रमांक पटकावत प्रमाणपत्र आणि रोख रक्कमेच्या पुरस्कारासाठी पात्र ठरली .

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शि . प्र . मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष , मा . विकासभाई सावंत, उपाध्यक्ष मा . सी एल नागवेकर, सचिव मा व्ही बी नाईक, खजिनदार मा सी एल . नाईक ,शालेय समिती अध्यक्ष मा . अमोल सावंत आणि इतर सदस्य यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले . राणी पार्वतीदेवी ज्यु कॉलेज चे मुख्याध्यापक श्री जगदीश धोंड , मुख्याध्यापिका श्रीम .संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्या डॉ . सुमेधा नाईक ,मार्गदर्शक प्रा महाश्वेता कुबल, प्रा. स्मिता खानोलकर , प्रा प्रज्वला कुबल, प्रा पूनम वाडकर , वर्गशिक्षक प्रा . डीसिल्व्हा, प्रा . दीपाली गवस, ग्रंथपाल श्री . देविदास कोरगावकर आणि इतर प्राध्यापकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top