सावंतवाडीजवळ एसटी बसखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

कोलगाव येथील घटना,सावंतवाडी पोलीस तपास करत आहेत

सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी- कुडाळ मार्गावरील कोलगावआयटीआयजवळ जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा एसटी बसच्या चाकाखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले आहे, कारण एसटीचे चाक चेहऱ्यावरून गेल्यामुळे चेहरा पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला आहे.

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संदीप राणे यांनी या घटनेची माहिती दिली. सध्या मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top