बांदीवडे येथे अनधिकृत वाळू वाहतूक करताना तीन डंपर जप्त..

मसुरे प्रतिनिधी
बांदिवडे मळावाडी येथे शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उशिरा अनधिकृत वाळू वाहतूक करत असलेले तीन डंपर पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करून जप्त केले असून सदरचे तिन्ही डंपर मसुरे पोलीस दुरक्षेत्र येथे आणण्यात आले होते. याबाबत आचरा पोलीस ठाणे येथे एफ आय आर दाखल करण्यात आला. दोन दिवसांपूर्वीच याच भागातील सात अनधिकृत रेती रॅम्प महसूल विभागाने जेसीपी च्या साह्याने उध्वस्त केले होते.

सदरची कार्यवाही करताना आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार मसुरे मंडळ अधिकारी दीपक शिंगरे पेंडूर मंडळ अधिकारी अजय परब प्रभारी ग्राम महसूल अधिकारी बांदिवडे भागवत जाधव ग्राम महसूल अधिकारी दत्तात्रय कुळपे मसुरे महसूल से व सचिन चव्हाण बांदिवडे मळावाडी पोलीस पाटील नरेश मसुरकर, आचरा पोलीस दूरक्षेत्र चे कर्मचारी, तसेच महसूल कर्मचारी आदी सहभागी झाले. होते. अनधिकृत वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले तीन डंपर यामध्ये एम एच 07 ए जे 30 72 या गाडीचा मालक संदीप रामू फटकारे राहणार दोडामार्ग असून वाहन चालक दत्तराज राजन मोडेकर, दुसरा डंपर जी ए 09 यू 3044 या गाडीचा मालक संदीप रामू फटकारे राहणार दोडामार्ग असून वाहन चालक विठ्ठल पांडाप्पा राठोड, तर तिसरा डंपर जी ए 09 यू 0835 मालक मंदार खडपकर कुडाळ असून वाहन चालक म्हणून गुंडू नंदाप्पा राठोड अशी नावे असून तिन्ही वाहनचालकांवर गुन्हा दाखल करून आचरा पोलीस ठाणे येथे अधिक चौकशी करण्यात येत असून याबाबतचे दंडात्मक कार्यवाही करण्याचे सुद्धा काम सुरू असल्याची माहिती मसुरे मंडळ अधिकारी दीपक शिंगरे यांनी दिली आहे. लागोपाठ दोन दिवसाच्या फरकामध्ये याच भागामध्ये अनधिकृत वाळू उत्खलन आणि वाळू वाहतूक याबाबत पोलीस आणि महसूल प्रशासन च्या वतीने केलेल्या कार्यवाहीमुळे अनधिकृत वाळू व्यवसायकांचे धाबे दणाणले आहेत. यापुढे सुद्धा अनधिकृत वाळू वाहतूक आणि वाळू उत्खलन याबाबत अशाच पद्धतीची ठोस कारवाई महसूल विभागाच्या वतीने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती ही महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top