
हिंदू धर्माची विचारधारा मनामनात रुजविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी
संत सेवा पुरस्कार ह.भ.प.रमाकांत गायकवाड,ह.भ.प. तायाराम गुरव यांना प्रदान.. कणकवली,ता.२९:-मला पायीवारीला चालण्याचा योग आला. त्यावेळी एक वेगळीच अनुभूती प्राप्त झाली. या संप्रदायाची वर्षानुवर्षे , पिढ्यान पिढ्या सुरू असलेली वारीची विचारधारा,विठ्ठल चरणी असलेली श्रद्धा व भक्ती एका दुसऱ्या प्रति असलेले प्रेम,जिव्हाळा,निस्वार्थ सेवेवरील निष्ठा यामुळेच पुढे गेली आहे. हिंदू धर्माची विचारधारा प्रत्येक हिंदूंच्या मनामनात रुजविण्याचे काम खऱ्या…