सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिर मध्ये दुपारचे तीन वाजता होणारा यज्ञाला सुरुवात
सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या गोतस्करी आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या घटनांविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी आणि हिंदु धर्माच्या रक्षणासाठी विश्व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्या वतीने २५ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता शहरातील श्री विठ्ठल मंदिरात ‘रुद्रयाग’ आणि ‘रक्षासूत्र बंधन’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे, गोरक्षक दादा मोडक आणि अधिवक्ता देवदास शिंदे उपस्थित रहणार आहेत अशी माहिती सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे,बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कृष्णा धुळपणावर, तालुका संयोजक साईराज नार्वेकर,गोरक्षक जिल्हाध्यक्ष दिनेश गावडे, यांनी दिली.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील बजरंग दलाच्या सर्व कार्यकर्त्यांसह बहुसंख्य हिंदू बांधवांनी उपस्थित व्हावे, असे आवाहन सकल हिंदु समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कृष्णा धुळपणावर,गोरक्षक जिल्हाध्यक्ष दिनेश गावडे सावंतवाडी संयोजक साईराज नार्वेकर आणि सहसंयोजक जितेंद्र रायका यांनी केले आहे.
यावेळी ३५ वर्षा खालिल युवकांना बजरंग दलामध्ये सामावून घेण्यात येणार आहे, जास्तीत जास्त हिंदू युवकांनी या परमेश्वरी कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे, यावेळी
बजरंगी तेजस मेस्त्री, संकल्प धारगळकर, अखिल मांजरेकर,धनु मोरजकर.