वेंगुर्ला नगर वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन…!

वेंगुर्ला,ता.३१:-वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत वेंगुर्ला येथील नगर वाचनालयातर्फे ३१ डिसेंबरपासून ग्रंथप्रदर्शन सुरू केले आहे. हे ग्रंथप्रदर्शन १ जानेवारी दुपारपर्यंत वाचकांसाठी खुले असणार आहे. या ग्रंथप्रदर्शनात संस्थेने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात खरेदी केलेले ग्रंथ ठेवण्यात आले आहे. तरी वाचकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More
Back To Top