VOM सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट!, आगामी उपक्रमांबद्दल केली चर्चा.
सावंतवाडी प्रतिनिधी
आजच्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभाला बळकट करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने केलेले कार्य आणि त्यांचे उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. संघटनेच्या माध्यमातून जे जे उपक्रम राबविले जातील, त्याला आपण योग्य ते सहकार्य नक्कीच करू, असे आश्वासन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिले आहे. तसेच अनेक देशांत विधायक कार्य करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे कार्य प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गारही यावेळी तहसीलदार श्री. पाटील यांनी काढले.
व्हॉईस ऑफ मीडिया संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने आजपर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची तसेच टीम सिंधुदुर्गच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली व सकारात्मक चर्चा केली. तसेच आगामी काळात विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे निमंत्रणही त्यांना दिले. यावेळी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, कार्याध्यक्ष भूषण सावंत, उपाध्यक्ष मिलिंद धुरी, खजिनदार आनंद कांडरकर, सदस्य साबाजी परब यांसह अन्य उपस्थित होते.