
परभणीच्या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा भाजपा च्या वतीने तीव्र निषेध.!
सिंधुदुर्गनगरी,ता.१३: परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील जगातील सर्वात मोठे असा गौरव केले जाणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या प्रतीची मंगळवारी १० डिसेंबर रोजी संध्याकाळी सोपान दत्तराव पवार या व्यक्तीने विटंबना केली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभारत उमटत आहे. ही घटना निंदनीय आहे याचा सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या (भाजपा) वतीने निषेध करण्यात आला आहे….