दहा हजार रूपये घेऊन विकले जाऊ नका…अन्नपूर्णा कोरगावकर
सावंतवाडी प्रतिनिधी१० हजार रूपये घेऊन दिवसाला ५ रुपयांना विकले जाऊ नका, आपली किंमत ओळखा. ५ वर्षांचा विचार करुन मतदान करा, नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक रिंगणात उतरले आहे. मला मेणबत्ती हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. त्यासाठी मला आशीर्वाद द्या असे आवाहन नगराध्यक्षपदासाठीच्या अपक्ष उमेदवार माजी उपनगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केले.
