सुधीर आडीवरेकर यांनी केला प्रचाराचा शुभारंभ…
सावंतवाडी प्रतिनिधीप्रभाग क्रमांक ५ चे उमेदवार सुधीर आडीवरेकर यांनी आज नरसोबा मंदिरात श्रीफळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रसंगी नगराध्य पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले तसेच महिला नगरसेवक पदाचे उमेदवार दुलारी रांगणेकर यांनीही प्रचाराचा प्रारंभ केला. प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही उमेदवारांना उस्फुर्त प्रतिसाद दिला.यावेळी युवराज लखम राजे भोसले यांची उपस्थिती होती….
