जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी मासेमारी बंदी कालावधीबाबत जिल्हा सल्लागार व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न
सिंधुदुर्गनगरी:केंद्र शासनाच्याअधिसूचनेनुसार देशाच्या पश्चिम सागरी किनारी सध्या १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून ६१ दिवस) असा एकसमान पावसाळी मासेमारी बंदी कालावधी लागू आहे. मात्र कोकण किनारपट्टीवरील पावसाळ्याचा कालावधी व समुद्रातील प्रतिकूल हवामान लक्षात घेता हा बंदी कालावधी 15 मे ते १५ ऑगस्ट एवढा वाढविण्याबाबत जिल्हा सल्लागार व सनियंत्रण समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात…
