
आंगणेवाडीतील श्री भराडी देवी वार्षिक जत्रोत्सव २२ फेब्रुवारीला…
मालवण,ता.१२:नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. आज देवीला कौल लावल्यानंतर तिच्या हुकुमानुसार जत्रोत्सवाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती आंगणेवाडी भराडी माता देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली.