
वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करावी..
ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आवाहन… वैभववाडी,ता.१६:-वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात यावी अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे. सदर मेलची प्रत अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व अध्यक्ष /सचिव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र…