
वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी संकटात; लाखोंचे नुकसान, कवडीमोल भावाने भरपाई, शेतकरी चिंताग्रस्त!
सावंतवाडी प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे बागायती,शेतीत होणाऱ्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. हत्ती, गवा रेडा, रानडुक्कर, वानर, माकड, शेकरू आणि मोरांसारख्या वन्यजीवांनी शेती व बागायतींमध्ये धुडगूस घालून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई अत्यंत तुटपुंजी असून, ती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासनाच्या दारात हेलपाटे घालावे लागत आहेत. यामुळे बागायतदार…