व्हॉईस ऑफ मीडियाने विधायक कार्यातून सिद्ध केली वेगळी ओळख : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण

VOM सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट, आगामी उपक्रमांबद्दल सकारात्मक चर्चा

सावंतवाडी(प्रतिनिधी)
केवळ बातमी देणे एवढाच उद्देश न बाळगता विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांतून व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने आपली अनोखी छाप सोडली आहे. पत्रकार बांधवांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आणि अनेक देशांत विधायक कार्य करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे कार्य प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी काढले.

व्हॉईस ऑफ मीडिया संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री.चव्हाण यांची सदिच्छा भेट घेऊन व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने आजपर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची तसेच टीम सिंधुदुर्गच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली व सकारात्मक चर्चा केली. तसेच आगामी काळात विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे निमंत्रणही त्यांना दिले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जयेश खंदरकर, तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, कार्याध्यक्ष भूषण सावंत, उपाध्यक्ष मिलिंद धुरी, खजिनदार आनंद कांडरकर, सदस्य साबाजी परब यांसह अन्य उपस्थित होते.
दरम्यान, व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमास आपले नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन देखील पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top