माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्याचा आरोप:माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

शिवसेनेच्या वरिष्ठांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांना वेळीच समज द्यावी

कणकवली प्रतिनिधी
नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेलेले राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आमचे नेते माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या बद्दल जे गैरसमज पसरवणारे वक्तव्य केले आहे. या बाबत श्री. गोगावले यांना महायुतीतील त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी समज द्यावी. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांसाठी व आम जनतेचे आदराचे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल भारतशेठ गोगावले यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे व बेताल असून भरतशेठ गोगावले यांच्या वरिष्ठांनी याची दखल घेत त्यांना तातडीने समज देण्याची गरज आहे. अशी मागणी कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top