केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक उपस्थित राहाणार!
कुडाळ तालुका भंडारी समाजाचा मेळावा आणि गुणगौरव सोहळा असा एकत्रित कार्यक्रम होणार:अतुल बंगे
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने रविवार २० जुलै रोजी दुपारी तीन वाजता सिध्दीविनायक हाॅल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा निश्चित करण्यात आला
कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाची तालुका नवीन कार्यकारिणीची सभा कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष श्री अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली सिध्दीविनायक मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड कुडाळ नुकतीच संपन्न झाली,
यावेळी तालुक्यातील प्रशालेत एक तीन क्रमांक आलेल्या भंडारी समाजाच्या दहावी ते बारावी व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा २० जुलै रोजी दुपारी 3 वाजता घेण्याचे निश्चित करण्यात आले
कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ नविन कार्यकारिणी नुकतीच अस्तित्वात आली आणि काम अगदी जोमाने करण्याचे ठरले असुन पाहीलाच कार्यक्रम विद्यार्थी गुणगौरव सोहळा व कुडाळ तालुका भंडारी समाज मेळावा घेऊन समाजाची पुढील वाटचाल करण्याचे निश्चित करण्यात आले
या सभेत समाजातील दीवंगत न्यात अन्यात यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ उपाध्यक्ष श्री प्रमोदशेठ चिंदरकर, सचिव शरद पावसकर, कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ माजी अध्यक्ष एकनाथ टेमकर, सदस्य श्री संतोष चिपकर, शिक्षक नेते श्री राजन कोरगावकर, मनोहर आरोलकर, विठ्ठल कांबळी, प्रभाकर साळगावकर, गुरुनाथ सरमळकर, विनोद मयेकर, दर्शन कुडव आदी उपस्थित होते