सावंतवाडी प्रतिनिधि
सांगली येथील केपीज बुदधिबळ ॲकेडमीने आयोजित केलेल्या खुल्या बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ करत सहा पारितोषिके पटकावली. जागतिक बुदधिबळ संघटना फिडेच्या एकशे एकव्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवर्य कुमार पांडुरंग माने यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहा राज्यातील आणि पाच देशातील तब्बल सहाशे खेळाडूंनी सहभाग घेतला.
