कणकवली प्रतिनिधी
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी आज सोमवारी प्रभाग १७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी जिल्हाभरातून राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष युतीचा, विजय असो अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढविणार असल्याचे यावेळी अबिद नाईक यांनी जाहीर केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री देव महापुरुषाला विजयासाठी साकडे घालण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, संजीवनी पवार, बाबू गायकवाड, सुभाष चव्हाण, प्रकाश चव्हाण, अनिस नाईक, प्रज्ञेश निगरे,संजिवनी पवार, शिल्पा नार्वेकर, शुभांगी नार्वेकर, जुहिली निग्रे, साक्षी तर्फे, शीला चव्हाण, प्रिया चव्हाण,सुनिता चव्हाण, गुरुदत्त हळवे, ज्ञानदेव हळवे, संतोष यादव, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
