अजित पवार गटाने ५ जागांवर उमेदवारी अर्ज केले दाखल!

सावंतवाडी प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या माध्यमातून ५ जणांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उल्का वारंग यांनी ऐनवेळी माघार घेतली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी त्या कक्षात दाखल झाल्या नाहीत. याबाबत तालुकाध्यक्ष उदय भोसले म्हणाले, त्यांच्याशी अजून संपर्क झालेला नाही. त्यांच्याशी संवाद साधून माघार का घेतली ते स्पष्ट करू, अस मत व्यक्त केले. तसेच आमचे ५ मावळे मैदानात असून ते विजयी होती, नगरसेवक म्हणून निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, उप मुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ यांची आम्हाला साथ असल्याचा दावा ज्येष्ठ नेते सुरेश गवस यांनी केला. यावेळी नगरसेवक पदासाठी उदय भोसले, आगस्तीन फर्नांडिस, दिशा कामत, रंजना निर्मल, ॲड. सत्यवान चेंदवणकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल. यावेळी शहराध्यक्ष सत्यजीत धारणकर, आगस्तीन फर्नांडिस, सौ‌. रिद्धी परब आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top