एकदा संधी द्या! सीमा मठकर यांचे आवाहन…

सावंतवाडीकरांकडून पाठिंब्याचा कौल;प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार…

सावंतवाडी प्रतिनिधी
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मठकर यांनी आपला प्रचार जोरात सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये त्यांनी आपल्या उमेदवारांसह घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. या प्रचार दौऱ्याला सावंतवाडीकरांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार गजानन वाडकर आणि दीप्ती केसरकर यांच्यासह सौ. मठकर यांनी घरोघरी प्रचार करून मतदारांची भेट घेतली. लोकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आपलाच विजय निश्चित होईल, असा विश्वास सौ. सीमा मठकर यांनी यावेळी व्यक्त केला. सावंतवाडीकरांनी आपल्याला एकदा संधी द्यावी, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे.सौ. मठकर यांनी सावंतवाडी शहरात प्रलंबित असलेले सर्व प्रश्न जोमाने हाती घेऊन ते मार्गी लावण्याचे आणि शहराचा विकास योग्य पद्धतीने करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या आश्वासनांना मतदारांनीही पाठिंबा दर्शविला आहे. नागरिकांच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून सौ. मठकर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन निश्चित मानले जात आहे. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत,हर्षल सावंत, राजू कासकर, अतुल केसरकर, सतीश आकेरकर, सारिका कासकर, महेश धुरी, आणि संतोष भैरवकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top