सावंतवाडीत हमखास ‘कमळ’ फुलणार!प्रचंड कार्यकर्त्यांसह माजी उपनगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश

असंख्य कार्यकर्त्यांसह माजी उपनगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश..

सावंतवाडी प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात भाजपा आपली विजयी पताका देशभरात पोहचवत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण साहेब राज्यात व कोकणात खासदार नारायण राणे साहेब व पालक मंत्री नितेश राणे साहेबांच्या नेतृत्वात नगरपरिषदा व नगरपंचायतींवर भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी सज्ज झाले आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाला घवघवीत यश मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाने
भाजपाचे युवा नेते विशाल परब व वेदिका परब यांच्यावर भाजपाने सोपवली त्या क्षणापासून अहोरात्र प्रचार यंत्रणा राबवताना दिग्गजांसह असंख्य राजकिय कार्यकर्त्यांना भाजपात आणण्याचा सपाटा लावला आहे.
सावंतवाडीतील वैश्यपाडा येथील माजी उपनराध्यक्ष महेश सुकी, प्रभाग क्रमांक तीन मधील माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी आपले प्रमुख
कार्यकर्ते माजी उपनराध्यक्ष महेश सुकी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसह
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या सर्वांचा सत्कार भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब, सौ. वेदिकाताई विशाल परब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धा लखम सावंत भोसले, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. श्वेताताई कोरगावकर, प्रदेश सदस्या सौ. संध्याताई तेरसे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री. लखमराजे भोसले, जिल्हा कार्यकारणी सदस्य यांच्या हस्ते व सौ. शर्वणी गावकर, उमेदवार आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, उदय नाईक, मनोज नाईक, मा. जि. प. अध्यक्ष सौ. श्वेता सावंत, मा. सभापती सौ. मानसी धुरी, रंगनाथ गवस, रवि मडगावकर, अमेय पे, बाळू सावंत, पप्पू कदम, संतोष गावडे आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top