कुडाळ प्रतिनिधी
येथील दत्त मंदिरात २८ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे.. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज स्थापनित हे मंदिर दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांनी उजळून निघणार आहे.
उत्सवाच्या प्रारंभी दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर दररोज सायं. ७.३० वा. पुराणवाचन, संध्या आरती व “ची पालखी सोहळा आयोजित केला आहे. तसेच ह. भ. प.. पृषोत्तम पोहोळकर यांचे कीर्तन होणार आहे. दि. ०३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वा. पारायण नामस्मरणाचा प्रारंभ होणार असून सायं. ७.३० वा. पुराणवाचन, आरती व पालखी सोहळा पार पडेल.दि. ०४ डिसेंबर (मार्गशीर्ष पौर्णिमा) रोजी मुख्य दत्तजयंती. या दिवशी सकाळी ७ वा. नामस्मरण समाप्ती, अभिषेक, महापूजा, दुन्हेरी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार आहे. दुपारी ३ वा. पुराणवाचन व जन्मोत्सव कीर्तन, तर सायंकाळी ६ वा. दत्तगुरूचा जन्मसोहळा विधीपूर्वक साजरा केला जाईल. रात्री “ची पालखी मिरवण्यात येणार आहे. दि. ०५ डिसेंबर रोजी सकाळी अभिषेक, पूजा, लघुरुद्राभिषेक, महापूजा, दुन्हेरी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद तसेच सायं. ६.३० वा. पुराणवाचन, आरती, पालखी सोहळा, लीलाचरित्र कीर्तन व दशभवानी ग्रंथप्रवचन आयोजित आहे. तरी या उत्सवाच्या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त मंदिर, माणगाव व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले आहे.
