सावंतवाडी प्रतिनिधी
येथील राजघराण्याने आज सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राजेसाहेब खेमसावंन भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले व सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, उर्वशी भोसले आदी उपस्थित होते. यावेळी काही झाले तरी या ठिकाणी आपला विजय निश्चित आहे. मतदार विकासाच्या मुद्द्यावर नक्कीच आपल्या पाठीशी राहतील, असा विश्वास सौ. भोसले यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व मतदाराने उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी सावंतवाडीकरांना केले.
