कुडाळ:
असं म्हणतात की जिद्द आणि चिकाटी अंगात असेल तर कोणताही पर्वत सहज पार केला जाऊ शकतो. असाच आव्हानांचा डोंगर पार करत कु. मिताली मिलिंद धुरी हिने कठीण मानल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथे इयत्ता ६ वी. मध्ये ९१. २५% ने प्रवेश मिळविला.
पहिली ते पाचवी मध्ये जिल्हा परिषद शाळा नंबर १ माणगाव मध्ये तिने अनेक स्पर्धामधे पहिल्या ३ क्रमांकांमध्ये सतत सातत्य ठेवले होते.त्याची पोचपावती म्हणून तीचा हा प्रवेश मानला जात आहे. या कामी श्री.एकनाथ कुर्लेकर सर,जीयाउद्दीन खतीब सर,सौ.संचिता सावंत मॅडम यांचं लाख मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मुलीच्या या यशाने तिचे वडील पत्रकार मिलिंद रामा धुरी, आई मनाली मिलिंद धुरी यांनी आनंद व्यक्त केला. मितालीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे..
