दारूसह १६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त…
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४ लाख २० हजाराच्या दारूसह १२ लाखाची गाडी असा एकूण १६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुभम शिवप्रसाद शितोळे (वय २७) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जुना बांदा-पत्रादेवी रोड, पंजाबी ढाबा येथे राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाकडून करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुना पत्रादेवी रोड पंजाबी धाबा येथे वाहनाची तपासणी करत असताना बेकायदा गोवा बनावटीची दारू आढळून आली. या प्रकरणी शुभम शितोळे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून १६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर विवेक कदम जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सतीश चौगुले, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री आदींच्या पथकाकडून करण्यात आली. अधिक तपास दुय्यम
निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहे.