digimarksolutionskudal@gmail.com

लघु पाटबंधारे आंबडपाल विभागात संविधान जागर…

भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान…

Read More

रेडी श्री देवी माऊली वार्षिक जत्रौत्सव 30 नोव्हेंबर रोजी…

रेडी येथील ग्रामदेवता व जागृत देवस्थान स्वयंभू श्री देवी माऊली वार्षिक जत्रौत्सव कार्तिक कृष्ण अमावास्या शके १९४६ शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त सकाळी महाअभिषेक समाराधना, केळी ठेवणे व मानवणे,ओटी भरणे, नवस बोलणे व फेडणे व सवाद्य श्रीं ची पालखी मिरवणूक, रात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व…

Read More

नूतन कामगार अधिकारी राजेश जाधव यांचे सिंधुदुर्ग बांधकाम कामगार कृती समिती यांच्यामार्फत करण्यात आले अभिनंदन…

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग कामगार अधिकारी म्हणून नवीन नियुक्त झालेले राजेश जाधव यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटना यांच्यामार्फत स्वागत व कामगारांना होणाऱ्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी स्वाभिमान कामगार संघटना अध्यक्ष प्रसाद गावडे श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, रत्नसिंधू कामगार संघटना अध्यक्ष अशोक बोवलेकर, सचिव एकनाथ सावंत,निवारा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण, बांधकाम…

Read More

विज्ञान प्रदर्शन २०२४-२५’ मध्ये माध्यमिक गटात भोसले इंटरनॅशनल स्कूल प्रथम….

५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीतील रेवण गवस व ओंकार गावडे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावला. ‘हायड्रोजन जनरेटर’ या संकल्पनेवर आधारित मॉडेल त्यांनी यावेळी सादर केले होते. जि.प.सिंधुदुर्ग, पंचायत समिती, सावंतवाडी व शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आंबोली येथे पार…

Read More

मायभूमी प्रतिष्ठान सावंतवाडीची निर्मिती ६३ वी महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्यस्पर्धा.

येथे 63 वी महाराष्ट्र राज्य मराठी औशी मराठी नाट्य स्पर्धा 2024 – 25 सुरू आहे. या नाट्य स्पर्धेत आज मायभूमी प्रतिष्ठान, सावंतवाडी निर्मित देशाभिमान जागविणारे दोन अंकी नाटक ‘मिशन -59’ आज सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मधुसूदन कालेलकर नाट्यगृह, वेंगुर्ले येथे सादर होणार आहे. या नाटकाचे लेखक प्रकाश माजलकर असून दिग्दर्शक प्रवीण…

Read More

सावंतवाडी तालुकास्तरीय शिक्षक विज्ञान साहित्य निर्मितीमध्ये दत्ताराम सावंत प्रथम तर मनोहर परब द्वितीय.

तालुकास्तरीय शिक्षक विज्ञान साहित्य निर्मितीमध्ये जिल्हा परिषदचे उपक्रमशील शिक्षक दत्ताराम सावंत (सरमळे शितप जि. प. शाळा) यांचा प्रथम क्रमांक तर मनोहर परब (बांदा सटमटवाडी जि. प. शाळा) यांचा द्वितीय तर प्रसाद विर्नोडकर (वाफोली) यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तिन्ही शिक्षकांवर विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

खानोली-सुरंगपाणी येथील दत्तमंदिरात दि. ८ ते १४ कालावधीत दत्तमहोत्सव…

खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन येथे दि. ८ ते दि. १४ डिसेंबर कालावधीत दत्तजन्म महोत्सवांतर्गत धार्मिक कार्यक्रम, अध्यात्मिक गुरुचरित्र पठण व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमीत्त रविवार दि. ८ डिसेंबर ते शनिवार दि. १४ डिसेंबर पर्यत दररोजन सकाळी ८ वाजता श्रीं ची पाद्यपुजा सकाळी १० वाजता गुरुचरित्र पारायण पठण दुपारी…

Read More

खवले मांजर तस्करी करणे आले अंगलट: वनविभागाने केली कारवाई..

बाजारात मौल्यवान असलेल्या खवले मांजर तस्करीच्या गुन्ह्यात कणकवली तालुक्यातील वारगाव येथे असलेल्या एका धाब्यावर सिंधुदुर्ग वनविभागाच्या पथकाने ५ आरोपीना रंगेहात पकडले असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. जिवंत खवले मांजरासह महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी १ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. लोरे नं १ गावातील विशाल विष्णू खाडये, देवगड…

Read More

वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्यता अभियानास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद…

कोकणचा तिरुपती ” अशी ओळख असलेले आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी मानाचा केळीचा घड देऊन अभियानाचा शुभारंभ… . भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियान २०२४ चा शुभारंभ २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला . भारतीय जनता पार्टीची विचारसरणी सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आलेले आहे.काश्मीर ते कन्याकुमारी , अंदमान…

Read More

सहलीवरून परतणाऱ्या बसला मध्यरात्री अपघात…

कणकवली,ता.०४:- तालुक्यातील मुंबई – गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथील ब्रिजवर असलेल्या डिव्हायडरच्या संरक्षक कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा मध्यरात्री २ च्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

Read More
Back To Top