रेडी येथील ग्रामदेवता व जागृत देवस्थान स्वयंभू श्री देवी माऊली वार्षिक जत्रौत्सव कार्तिक कृष्ण अमावास्या शके १९४६ शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त सकाळी महाअभिषेक समाराधना, केळी ठेवणे व मानवणे,ओटी भरणे, नवस बोलणे व फेडणे व सवाद्य श्रीं ची पालखी मिरवणूक, रात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी व भक्तगणांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान रेडी व ग्रामस्थ रेडी यांनी केले.
