बाजारात मौल्यवान असलेल्या खवले मांजर तस्करीच्या गुन्ह्यात कणकवली तालुक्यातील वारगाव येथे असलेल्या एका धाब्यावर सिंधुदुर्ग वनविभागाच्या पथकाने ५ आरोपीना रंगेहात पकडले असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. जिवंत खवले मांजरासह महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी १ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. लोरे नं १ गावातील विशाल विष्णू खाडये, देवगड मुटात येथील संदीप तानाजी घाडी, गिरीधर लवू घाडी, गुरुनाथ धोंडू घाडी अशी चार आरोपींची नावे आहेत. तर यातील पाचवा आरोपी १७ वर्षीय असून तो अल्पवयीन आहे. सर्व आरोपींवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, श्री. बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेस्ट रेंजर सचिन शिडतुरे, महेश पाटील, वनपाल श्री. कांबळे, सर्जेराव पाटील, प्रमोद जगताप, विष्णू नरळे, सचिन पाटील, सिद्धार्थ शिंदे, दीपाली पाटील, कोमल करकुळ, यांच्या पथकाने केली.
