सावंतवाडी,ता.१२:
येथील श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी कुमार तुकाराम महादेव तायशेटे याची जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने 26 नोव्हेंबर 2024 रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यामध्ये श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने किक बॉक्सिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून आता तो राज्यस्तरावर खेळणार आहे. त्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले, संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम. ए. ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही.पी. राठोड, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. आर. एम. सावंत, प्रा. एम. व्ही. भिसे आदि उपस्थित होते.
