कणकवली,ता.१५: कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिपद जाहीर झाले. यानंतर आमदार नितेश राणे केव्हा मंत्री पदाची शपथ घेणार यांची उत्ससूकता लागून राहिली होती. अखेर आज आ. नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरात शपथविधी पाहण्यासाठी थेट लाईव्ह स्क्रिन लावण्यात आली होती. दरम्यान आ. नितेश राणे यांनी शपथ घेताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी व फटाके लावून जल्लोष साजरा केला.