साईप्रसाद काणेकर:उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांच्याकडे निवेदनद्वारे केली मागणी..
बांदा, ता.१९:-
माकडांपासून शेती बागायतीचे भरपूर नुकसान करण्यात येते. नागरिक व शेतकरी यांना माकडांच्या उपद्रवापासून रोखण्यासाठी जलद कृती दलामार्फत त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना ठाकरे गटाचे बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांच्याकडे केली आहे.