दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने होणार जल्लोष.!
सावंतवाडी,ता.२२:-
येथील दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावंतवाडी महोत्सव – २०२४’ चे शानदार आयोजन करण्यात आले आहे. २९ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ रोजी जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद भागवत, दीपक भाई केसरकर मित्रमंडळाचे गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, अर्चित पोकळे, सुरेंद्र बांदेकर, युवा सेनेचे प्रतीक बांदेकर तसेच इनरव्हील क्लबच्या डॉ. सुमेधा धुरी – नाईक, रिया रेडीज, देवता हावळ, सायली होडावडेकर, शर्वरी धारगळकर आदी उपस्थित होते.