अजयराज वराडकर:वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..
मालवण,ता.२३:
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनासारखे सहशालेय उपक्रम राबविणे हे प्रत्येक शिक्षण संस्थांचे काम असून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नेहमीच दक्ष आहे विद्यार्थ्यांनी जिद्द आत्मविश्वास, कठोर परिश्रम यांच्या साथीने प्रगतीचे शिखर गाठावे असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी येथे बोलताना केले.