संविधान सन्मान कृती समितीतर्फे सावंतवाडीत निषेध मोर्चा!
सावंतवाडी,ता.२४:-
ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशात संविधानाद्वारा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी जीवाचे रान केले, त्याच बाबासाहेबांचा केला जाणार अवमान आम्ही कदापि सहन करणार नाहीत. वारंवार केला जाणारा संविधानाचा आणि बाबासाहेबांचा अवमान म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीचा अवमान आहे, असा सूर संविधान सन्मान कृती समितीच्या निषेध मोर्चात मान्यवरांनी व्यक्त केला.