मुंबई,ता.२७:-
कामगार मंत्री महोदय आकाशजी फुंडकर साहेब यांची आज मंत्रालय मुंबई येथे श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त पंढरी चव्हाण व श्रमिक कामगार संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश सुस्विरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार, घरेलु कामगार यांच्या प्रश्र्नांविषयी चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार व घरेलु कामगार यांचे प्रश्न अजून ही तसेच प्रलंबित आहेत त्यामुळे सदर प्रश्न लवकरात लवकर सोडवावे अशी विनंती केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कष्टकरी कामगार वर्गासाठी कामगार भवन उभारण्यात यावे जेणेकरून कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध होतील अशी आग्रही मागणी संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी केली. यावेळी फुंडकर साहेबांनी आपली संकल्पना खूप चांगली असून आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये कामगार भवन लवकरच उभारण्यात येइल असे आश्र्वासित करण्यात आले तसेच कामगार यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे व सोडविणार असे सांगितले.